लियाफीतर्फे उत्कृष्ट व शतकविर अभिकर्ता यांचा सत्कार

54

लियाफीतर्फे उत्कृष्ट व शतकविर अभिकर्ता यांचा सत्कार

लियाफीतर्फे उत्कृष्ट व शतकविर अभिकर्ता यांचा सत्कार

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी,मो. नं-9822724136

सावनेर-30 जानेवारी 2022
सावनेर येथील एल आय सी कार्यालयात मागील वर्षी उत्कृष्ट व शतकविर झालेल्या अभिकर्त्यांचा लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (लियाफी) वतीने २४ जानेवारी या अभिकर्ता व्यवसाय संरक्षण दिनी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला लियाफी नागपूर विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत हिंगे, सचिव प्रमोद ठाकरे, पणपलियाजी, बलवानीजी व शाखा व्यवस्थापक युवराज हातझाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित शेकडो अभिकर्त्यांना पाहुण्यांनी विमा व्यवसाय, बाजारात होत असलेले बदल, अभिकर्ता यांच्यासाठी लियाफी तर्फे होत असलेल्या मागणी संबंधित व विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सावनेर शाखेमध्ये मागील वर्षी ८ अभिकर्ता MDRD साठी पात्र झाले तर १८ अभिकर्ता शतकविर झाले होते. या यशस्वी अभिकर्त्यांचा सत्कार स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला.
प्रास्ताविक धनराज निकोसे, मंच संचालन मनीषा नान्हे, तर आभार प्रदर्शन रितेश सुर्यवंशी यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, रंजन महाजन, विष्णू डाखरे, गजानन ढगे, रविंद्र डहाके, धवल डुंमरे, प्रशांत गजभिये, सोनल बागडे आदींनी प्रयत्न केले.