कर्ज नव्हते तरी फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळुन महिलेने प्राशन केले विष, दुर्दैवी मृत्यू.
✒मुकेश चौधरी, उपसंपादक✒
📱7507130263
वर्धा:- भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनी वर्धा शहरात एक जिल्हात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली होती. खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज नसतानाही कर्ज भरण्याच्या तगदा लावल्याने एका महिलेने विष प्राशन केल होते आज त्या महिलेची प्राणज्योत मावळली. त्या मृतक महिलेचे नाव छाया राजेंद्र श्रिवास राहणार ठाकरे मार्केट वर्धा हे आहे.
कोरोना वायरसच्या महामारीने जिल्हातील जनता अगोदरच त्रस्त आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आहे. परिवाराचे पालन पोषण करने कष्टमय झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता खाजगी फायनान्स कंपन्या कर्ज वसुलीचा तगदा लावला आहे. त्यामुळे अनेक परिवार भयमय स्थितीत दिसून येत आहे.
वर्धा शहरातील ठाकरे मार्केट परिसरात राहणा-या छाया श्रीवास यांनी खाजगी फायनान्स कंपनी द्वारा बनवण्यात आलेल्या बचत गटातुन कुठलेही कर्ज घेतलेले नसतांनाही फायनान्स कंपनीचे कर्मचारी छाया श्रीवास यांचा कर्ज घेतल्याचे सांगून कर्जाचा हप्ता भरण्याचा सततचा तगदा लावला होता. त्यामूळे ते माघील काही दिवसापासुन त्रस्त होत्या. त्यामूळे त्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दुपारच्या सुमारास विष प्राशन केल होते. विष प्राशन केल्याच लक्षात येताच यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची स्थिती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होता. काल पहाटेला त्यांची प्राणज्योत मावळली.
फायनान्स कंपनीने लावलेल्या सततच्या जाचाला कंटाळुन महिलेने विष प्राशन केले. त्यामूळे छाया श्रीवास यांना मृत्यूचा दारात नेणा-या फायनान्स कंपनीच्या आधिका-यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करुन मृतक महिलेला न्याय द्यावा अशी स्थनिक रहवासी जनतेची आणि शिवशेना, भाजपाच्या कार्यकर्ताची मागणी आहे. त्याबाबत त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.