आरे वाचवा’ चा संदेश घेऊन ठाण्यातील युवकाने केदारकांठा पर्वत शिखर केले सर

48

आरे वाचवा’ चा संदेश घेऊन ठाण्यातील युवकाने केदारकांठा पर्वत शिखर केले सर

आरे वाचवा' चा संदेश घेऊन ठाण्यातील युवकाने केदारकांठा पर्वत शिखर केले सर

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- महाराष्ट्रात नव्यानेच सत्तेवर आलेल्या राज्यसरकारने आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडकरीता परवानगी दिल्याने पर्यावरप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरे मेट्रो कारशेड – ३ करीता मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरचे अनेक पर्यावरणप्रेमी यासाठी आजही निरंतर विरोध करत आहेत.
अशाच एका ठाण्यातील सौरभ करंबेळकर या पर्यावरणप्रेमीने १३००० फूट उंच असलेला उत्तराखंडमधील केदारकांठा पर्वत शिखरावर चढून ‘Save Aarey Forest’ चा संदेश देत आपले निसर्गप्रेम सर्वांना दाखवून दिले. आरे वाचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतींचा वापर करून निसर्गप्रेमी आरे वाचवा चा संदेश देत आहेत. सौरभला केदारकांठा पर्वत पार करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी लागला. मुंबईचे फुफुस मानले जाणारे आरेचे जंगल आता मेट्रो कारशेड मुळे धोक्यात आले आहे.
मुंबईतील आरेचे जंगल वाचवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या, सृजनशील आणि आव्हानात्मक मार्गाने संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.