मौजा काकरगटा येथे सल्ला गांगरा शक्ती स्थापना तथा कोया पूनेम सम्मेलन संपन्न

51

मौजा काकरगटा येथे सल्ला गांगरा शक्ती स्थापना तथा कोया पूनेम सम्मेलन संपन्न

मौजा काकरगटा येथे सल्ला गांगरा शक्ती स्थापना तथा कोया पूनेम सम्मेलन संपन्न

ता.प्रतिनिधी / महेश बुरमवार

मुलचेरा : – मुलचेरा तालुक्यातील मौजा काकरगटा येथे पारंपरिक ईलाका ग्रामसभा तथा क्रांतिवीर बाबुराव सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सल्ला गांगारा स्थापना ,कोयापुनेम सम्मेलन तथा सप्तरंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी कर्क्रमाचे अध्यक्ष:कु. साधनाताई मडावी सरपंचा, उद्घाटक: गिरमाजी सिडाम प्रतिष्ठित,सह उद्घाटक:प्रदीप कोडापे, ग्रा.पं.सदस्य,सप्तरंगी *ध्वजारोहण: मा.कालिदास भाऊ कुसनाके अध्यक्ष,ई.ग्रामसभा,*प्रमुख मार्गदर्शक*: *मा.सत्यनारायण कोडापे साहेब,राजेंद्र मडावी सर,महेश मडावी सर,कालिदास भाऊ कुसनाके*
*प्रमुख अतिथी*:*सत्यवान सिडाम उपाध्यक्ष ई.ग्रामसभा,आनंदजी सिडाम*
प्रमुख पाहुणे:….प्रेमकला पेंदाम, भावना कुसनाके, सिडाम म्यॅडम,रजनी मडावी, जोगदास कुसनाके, सुरेश मडावी, गिरमाजी सिडाम, हणमंतू आत्राम, जयराम दडजाम, कीर्तिमंतराव सिडाम, तुकाराम सडमेक, दिनेश कुसनाके, शंकर गावडे, लक्ष्मण सडमेक, अक्षय सोयाम, रमनदास सोयाम,
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थित समाज बांधवांना कोयापूने संस्कृती ही प्राचीन व सभ्य संस्कृती असून इतर संस्कृती पेक्षा भिन्न असून कोयापुनेन संस्कृती टिकविणे काळाची गरज आहे.स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्ण झाले असून आदिवासी समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक.आरोग्यच् शेतीच्या या समस्या जसे तसेच आहेत. म्हणून अनुसूची ५ व ६ लागू करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नसून सर्व समाज बांधवांनी समाजाच्या हक्क अधिकारासाठी कोणतेही राजकीय भेदभाव न करता समाजहितासाठी तसेच थोर महात्म्यांच्या आणि लोक नेत्यांच्या सन्मानासाठी एकत्रितणे लढा देण्याची आवश्यकता असल्याचे उपस्थित मान्यवरांनी .जनसमुदायाला मार्गदर्शन केले .त्यावेळी ई. ग्रामसभा लगाम अंतर्गत तथा मुलचेरा, अहेरी, चामोर्शी,सिरोंचा, व इतर तालुक्यातील समाज बांधव युवा युवती, विद्यार्थी विद्यार्थिनी ,सामाजिक कार्यकर्ते आजी माजी सर्व सरपंच ,पो.पाटील, कर्मचारी,बहुसंख्येने उपस्थितीत होते संचालन. रमेश कोवे सर तर प्रास्ताविक विकास सेडमाके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील युवक, प्रतिष्ठित नागरिक व तसेच गावातील सर्वांनी सहकार्य केले.