एम एम जगताप महाविद्यालयास करियर कट्टा अंतर्गत जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहीर
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-महाड येथील लोकविकास सामाजिक संस्थेचे एम एम जगताप कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अँड कॉमर्स महाड रायगड मधील महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या करियर कट्टा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयास राज्यस्तरीय महाविद्यालय स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळालेला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे .सदर करिअर कट्ट्या अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यातील उद्योजकता विकास आणि आयएएस आपल्या दारी हे दोन उपक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात आले तसेच विद्यार्थ्या करिता डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी आणि सायबर लॉ हे दोन ऑनलाईन कोर्सेस घेण्यात आले याच विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनात आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी म्हणून शेअर मार्केट मार्फत दोन उपक्रम राबविण्यात आले तसेच विद्यार्थ्यां चे करिअर घडवण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालयीन स्तरावर विविध संस्थामार्फत राबविण्यात आलेले आहे.
करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा मोक्षदा म्हस्के मॅडम यांनी अत्यंत मेहनत घेऊन सदर क्रमांक महाविद्यालयास मिळवून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ,संस्थेचे चेअरमन मा. श्री हनुमंत जगताप उर्फ नानासाहेब व सौ स्नेहल दीदी माजी नगराध्यक्ष महाड नगर परिषद आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री चिखले सर,रोहित पोरे, भुपेश पाटील व इतर यांनी विशेष कौतुक केलेले आहेत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाणी एम एन व सर्व कर्मचारी वर्ग प्राध्यापक वर्ग यांनी मस्के मॅडम व प्राची मॅडम यांचे विशेष अभिनंदन केले आहे याच कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात एक फेब्रुवारीपासून संगणक दुरुस्ती आणि नेटवर्किंग हा उपक्रम राबवला जात आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान प्राचार्य डॉ वाणीएमएन सर यांनी केले आहे. महाविद्यालयाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे आणि अशीच महाविद्यालयाची प्रगती हो अशी ईश्वरचरणीय प्रार्थना