अ.ब.ब. गावातील भांडणे पोलीस ठाण्यात , तर तंटामुक्त समिती करते काय ? गावात वाढले वादविवाद, त.मु.स. समित्या केवळ कागदा पुरत्याच ?

85
अ.ब.ब. गावातील भांडणे पोलीस ठाण्यात , तर तंटामुक्त समिती करते काय ? गावात वाढले वादविवाद, त.मु.स. समित्या केवळ कागदा पुरत्याच ?

अ.ब.ब. गावातील भांडणे पोलीस ठाण्यात , तर तंटामुक्त समिती करते काय ?

गावात वाढले वादविवाद, त.मु.स. समित्या केवळ कागदा पुरत्याच ?

अ.ब.ब. गावातील भांडणे पोलीस ठाण्यात , तर तंटामुक्त समिती करते काय ? गावात वाढले वादविवाद, त.मु.स. समित्या केवळ कागदा पुरत्याच ?

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात दिवसेंदिवस वाद वाढल्याचे दिसून येत आहे. ही मोठी समस्या प्रत्येक गावात आहे.म्हणून शासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने गावातील शांतता अबाधित राहावी , गुन्हेगारी संपुष्टात यावी या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या तंटामुक्त गाव समित्या केवळ कागदापुरत्याच राहिल्या आहेत. मात्र गावातील वाद आता थेट पोलीस स्टेशन पर्यंत येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव समिती केवळ नावापुरत्याच राहिल्या आहे.
गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने राज्यभरात ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती स्थापन करण्याच्या शासन निर्णय १६ डिसेंबर २००७ रोजी काढण्यात आला. चांगले काम करणाऱ्या समितीला जिल्हास्तरावरचे दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जात होते. त्यामुळे तंटामुक्त समिती अतिशय कार्यक्षमपणे काम करीत होत्या. मात्र बक्षिसाची रक्कम मिळणे बंद झाल्यानंतर तंटामुक्त समिती माघारल्या आहेत. ही एक संताप जनक बाब आहे.
*भंडारा जिल्ह्यात ५४१ च्या वर तंटामुक्त समित्या*

जिल्ह्यात एकूण ५४१ ग्रामपंचायती आहेत. बहुतांश ग्रामपंचायती मध्ये तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. मात्र प्रत्येक गावात ही समिती नावापुरती व कागदावरच आहे. राज्य शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त गाव समित्या स्थापन केले जातात. अध्यक्ष व इतर सदस्यांची दोन वर्षासाठी निवड केली जाते. मात्र या समितीचे अस्तित्व केवळ कागदावरच दिसते. प्रत्यक्षात या समित्या थेट प्रश्न सोडवितांना दिसतच नाही. ही एक संतापाचीच बाब आहे. या समित्यांवर कुणाचेही देखरेख नाही. मनमर्जी प्रमाणे कार्य करीत आहेत. यामुळे जनता जनार्दन मात्र थेट पोलीस स्टेशनला पायवाट करत असल्याचे दिसून आले आहे. हे कितपत योग्य आहे ?
*गावातील तंटामुक्त समितीचे कार्य काय ?*
गावातील वाद गावातच सोडविणे हे महत्त्वाचे काम तंटामुक्त समितीचे आहे. यामुळे पोलीस स्टेशन वरील कामाच्या बाहेर कमी होऊन गावातच न्याय मिळेल हा यामागील उद्देश आहे.
*तंटामुक्त समितीचे दुर्लक्ष, गावात वाढली दारू विक्री*
पूर्वी तंटामुक्त समिती गावात दारू विक्री करू देत नव्हती. मात्र आता केवळ नाममात्र समिती आहे. त्यामुळे गावात दारू विक्री वाढली आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
*बक्षीस बंद झाल्याने समित्यांवर आली मरगळ*
पोलीस विभागामार्फत तंटामुक्त गाव समित्यांच्या कामाची तपासणी केली जात होती. जिल्हा तालुका व पोलीस स्टेशन स्तरावर बक्षीस दिले जात होते. त्यामुळे तंटामुक्त समिती आहे अतिशय कार्यक्षमपणे काम करीत होत्या. आता मात्र बक्षीस दिले जात नाही. त्यामुळे रेकॉर्ड सुद्धा लिहिला जात नाही. तो ग्रामविकास विभाग किंवा पोलिसांकडे पाठविला जात नाही. त्यामुळे तंटामुक्ती समित्यांमध्ये दिवसेंदिवस एक प्रकारची मरगळ आली आहे. म्हणून शासनाने स्थानिक प्राधिकरणातील संपूर्ण समित्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.