चंद्रपूर जिल्ह्यात 10 एप्रिल ला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

52

चंद्रपूर जिल्ह्यात 10 एप्रिल ला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

चंद्रपूर जिल्ह्यात 10 एप्रिल ला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

मनोज खोब्रागडे
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 30 मार्च :- चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्या स्तरीय न्यायालयांमध्ये दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्त्वाची प्रकरणे लोक न्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचे निवारण यावेळी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोर्टातील समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे (कामगारांसंबंधी निस्तारणा संबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायद्याची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आपसी सामंजस्याने सोडविण्याकरिता ठेवण्यात येणार आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर, येथे अथवा हेल्पालाईन क्रमांक 07172-271679, मोबाईल क्रमांक 9765628961, 9325318616 अथवा 8999954259 यावर संपर्क करावा.

या राष्ट्रीय लोक अदालत संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या. कविता बि. अग्रवाल यांनी केले आहे.