” प्रॉपर्टीच्या वादात दोन गटात झाली हाणामारी ” १३जणांविरुद्ध गुन्हा दाखल ” दिली जिवेनिशी ठार मारण्याची धमकी “
✍ भवन लिल्हारे ✍
!! भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी !!
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
भंडारा :- विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रॉपर्टीच्या वादात दोन गटांमध्ये हाणामारी होण्याची घटना भंडारा येथील अन्सारी वॉर्डांत घडली. या प्रकरणात दोन्ही गटांच्या १३ जणांविरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजीया इरफान अलीखान वय ३५ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या आपल्या पतीसह दिनांक २७ मार्च २०२२ रोज रविवारी आपल्या मुलाला शिवाजी स्टेडियमवर सायंकाळी प्रॅक्टिससाठी सोडण्यास जात असता त्यावेळी प्रॉपर्टीच्या पैशावरून मुस्लिम लायब्ररी चौकात आठ जणांनी त्याला अडवून बुक्यान मारहान केली. याप्रकरणी नजीयाने दिलेल्या तक्रारीवरुण इमरान खान वय ४५ वर्षे, रिजवान खान वय ५२ वर्षे, रश्मा खान वय २२ वर्षे, रिजवाना खान वय ४६ वर्षे, तबस्सुम खान वय ३२ वर्षे यांच्यासह आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
तर रिजवान अलीखान वाजीत अली खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे आपल्या घरी झोपले असता त्यावेळी त्यांचा भावाचा ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी ते बाहेर आले असता पाच जन हातात चाकु घेऊन जिवेनिशी ठार मारण्याची धमकी देत होते. त्यांना विचारपुश केली असता त्यांनी वाईट वाईट शिव्यागाळ करून रिजवान अली व त्यांच्या पत्नीला मारहान केली. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून इरफान अली खान, वाजीत अली खान, नजीया इरफान अली खान, रिहान शेख, आशिफ शेख, हे पाचही आरोपी रा. सडक अर्जूनी जिल्हा गोंदीया यांच्यावर पोलीस स्टेशन भंडारा यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भंडारा हे करीत आहेत.