आक्सापूर-पोंभुर्णा मार्गाच्या दुरस्थिसाठी केलेल्या रास्तारोको आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-आज चिंतलधाबा येथे आटो युनियन चे पदाधिकारी संभाजी वासेकर,दीपक कवटलवार,संदिप कोडापे,रंजित जूवारे,नितीन ऐरोजवार,घनश्याम आगरकर,राजेंद्र तालेवार,विनोद धोडरे या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आक्सापूर-पोंभुर्णा मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा सोबतच लवकर रस्त्याचे काम पूर्ण करा मागणीला घेऊन दोन तास रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन स्थळी भेट देऊन शिवसेनेतर्फे पाठिंबा देण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,तालुका संघटक शैलेश बैस,युवासेनेचे तुकाराम सातपुते यांची उपस्थिती होती .भविष्यात होणाऱ्या आटो युनियन च्या आंदोलनात कायम सोबत राहू पाठिंबा असेल…