देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढवावी : काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मारला टोला

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढवावी : काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मारला टोला

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढवावी : काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मारला टोला

✍ *त्रिशा राऊत*✍
नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.(9096817953)

नागपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे आमदार असले तरी ते आता मुंबईच्या राजकारणात रमले आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढवावी असा टोला काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मारला.विरोधात असताना देवेंद्र फडणवीस स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो वा विदर्भातील इतर महत्त्वाच्या प्रश्नावर सातत्याने झटत होते. विधानसभेत आवाज उठवत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विदर्भाकडे दुर्लक्ष केले. आता विरोधीपक्षनेते आहेत. मात्र मागील दोन अडीच वर्षात विदर्भातील धान, बरोजगारीचा, भेल सारखा मोठा बंद असलेल्या प्रकल्प असो वा नागपूरसंदर्भातील कोणताच मुद्दा उपस्थित केला नाही.
मुख्यमंत्री असतानाही दोन आठवड्यांपेक्षा जास्त नागपूरचे अधिवेशनही त्यांनी घेतले नाही. आता ते विदर्भ व नागपूरला विसरले असून मुंबई, दिल्लीच्या राजकारणात रमले आहेत. फडणवीस यांनी नागपूर व विदर्भाच्या जनतेच्या विश्वासाला तडा दिला असून आता त्यांनी नागपूरमधून नाही तर मुंबईतूनच निवडणूक लढवावी, असेही लोंढे म्हणाले.
विरोधी पक्षनेते झाल्यावर तरी विदर्भातील प्रश्नांवर ते बोलतील असे अपेक्षा होती पण त्यांनी विदर्भाच्या जनतेचा अपेक्षाभंग केला. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा फक्त मंत्री, मुख्यमंत्री होण्यासाठी वापरला. राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्याने विदर्भाचे राज्य करू असे आश्वासन भाजपने वैदर्भीयांना दिले होते. याचाही विसर फडणवीसांना पडला. विरोधी पक्षनेते म्हणून फक्त आरोप प्रत्यारोप करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विदर्भाचा एकही प्रश्न त्यांनी मांडला नाही. आपले नेतृत्व उभे करण्यासाठी विदर्भ व नागपूरच्या जनतेचा वापर करून घेतल्याचा आरोपही अतुल लोंढे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here