एन. एस. एस. शिबिरार्थीचे सागरबागेत श्रमदान.
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:8806839078
हिंगणघाट- पर्यावरण संवर्धन संस्थेने साकारलेल्या सागरबाग या मेडिसिन पार्क मध्ये बिडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ८० विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. निखाडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी सहभागी झाले. पिंपळगाव येथे सेवा योजनेचे शिबीर आयोजित आहे.
यावेळी दिगांबर खांडरे, प्रा. अभिजित डाखोरे, प्रा.श्रीकृष्ण बोढे, उमेश मंगरूळकर, शुभांक खांडरे उपस्थित होते.
दिगंबर खांडरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात आपण पर्यावरणाच्या विषयाकडे कसे वळलो याबद्दल माहिती दिली आणि युवकांनी अधिकाधीक संख्येने पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी व्हायला हवे असे सांगितले.
प्रा. डाखोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शुभांक खांंडरे आणि उमेश मंगरूळकर यांनी विद्यार्थ्यांना सागरबागेतील झाडांविषयी माहिती सांगितली. आशिष भोयर यांनी सागरबागची पार्श्वभुमी मांडली. विनय मोरे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानासाठी पर्यावरण संवर्धन संस्थेने त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सक्रिय सभासद विनयभाऊ मोरे, प्रमोद माथनकर, प्रविण मुजबैले, कलोडे सर, निलेश बलखंडे, हेमंत हिवरकर, सचिन थुल यांनी सहकार्य केले. तसेच पर्यावरण संवर्धन संस्थेसोबत जुळण्याची विद्यार्थ्यांनी इच्छा व्यक्त केली.