नवीन शिधा-पत्रिका धारकांना ताबडतोब अन्न-धान्य मिळाले पाहिजे
नागभीड शिवसेनेची मागणी
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड -तालुक्यात नविन प्रस्तावित 3502 शिधापत्रिका धारकांना ताबडतोब अन्न धान्याचा पुरवठा करून त्यांच्या कुटुंबाला उपासमारीपासून दिलासा देण्यात यावा, नागभीड शिवसेना उप-तालुका प्रमुख मनोज लडके यांची शिवसेना कार्यकर्ता ची मागणी.
नागभीड तालुक्यात अंत्योदय शिधापत्रिका धारकांची संख्या 9360, धान्य वितरण प्रणालीतील प्राधान्य गट कार्डधारक 18975, आणि नवीन प्रस्तावित 3502 असे एकूण 31837 शिधापत्रिका धारक आहेत, यापैकी माहे डिसेंबर 2021च्या आकडेवारीनुसार, नागभीड तालुक्यात 3502 नवीन शिधापत्रिका धारक असून गेल्या अनेक दिवसांपासून नवीन शिधापत्रिका धारकांना, शासनाच्या अन्न-धान्य पुरवठा योजनेचा लाभ मिळत नाही आहे. त्यामुळे हे नवीन शिधापत्रिका धारक शासनाच्या अन्न-धान्य पुरवठा योजनेपासून वंचित आहेत, परिणामी या नवीन शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधीच दोन-अडीच वर्षे कोरोनामध्ये रोजगार हिरावल्या गेला आणि त्यानंतर शासनाकडून अन्न-धान्याची ददात अशा या दुहेरी संकटात तालुक्यातील नवीन शिधापत्रिका धारक सापडला आहे.
या बाबतचे निवेदन, मा. मुकेशभाऊ जीवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख, मा. अमृतभाऊ नखाते शिवसेना उप-जिल्हा प्रमुख, मा. भोजराजभाऊ ज्ञानबोनवार शिवसेना तालुका प्रमुख यांचे मार्गदर्शनात आणि मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात तसेच बंडूभाऊ पांडव उप-तालुका प्रमुख, नाझीम शेख युवासेना समन्वयक, अजित गोडे युवासेना तालुका प्रमुख, अमित अमृतकर विभाग प्रमुख, संतोष बुरबांधे शाखा प्रमुख यांचे प्रमुख उपस्थितीत, मा. चव्हाण साहेब तहसिलदार नागभीड यांना निवेदन देण्यात आले.