तहानलेल्या व उपाशी मजुरांसाठी धावून आले गोपाल जगन्नाथ
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : दोन दिवसा पासून चामोर्शी मार्गांवरील कैकाडी वस्ती जवळ अडकून असलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना पाणी, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
शुक्रवारी मध्यप्रदेश राज्यातील मजूर मिरच्या तोडून परत येत असताना. त्यांच्या गाडीचे बेरिंग तुटल्यामुळे चामोर्शी मार्गावरील शासकीय महाविद्यालय जवळ अडकून होते.
रात्रीची वेळ असल्यामुळे व त्या परिसरात अंधार असल्याने त्यांच्या कडे कुणाची पण लक्ष पडत नव्हती.
त्या परिसरात कैकाडी समाजाची वस्ती असल्याने तिथून जाणाऱ्या गोपाल जगनाथ यांना या बाबत माहिती मिळाली. त्यांची लगेच आपल्या सहकारी नागा कंडेलवार, बादल जगन्नाथ यांना सोबत घेऊन त्यांची विचारपूस केली. व उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वप्रथम त्यांना पिण्याचे थंड पाणी आणून देण्यात आले. व बिस्कीट नाश्ताची व्यवस्था करण्यात आली.
गोपाल जगन्नाथ व त्यांचे सहकारी नेहमीच लोकांच्या मदती साठी धावून येतात. या मुळे मजुरांनी त्यांचे आभार मानले.