श्री. बहिरेश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

श्री. बहिरेश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 
✍️मंजुळा म्हात्रे ✍️
नागोठणे शहर प्रतिनिधी
मो. ९२८४३९३४४८

नागोठणे :- समस्त भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिहू गावचे ग्रामदैवत श्री. बहिरेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळा श्री. राम जय राम जयजय राम या मंत्रघोषाने मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ ते गुरुवार दि.३ एप्रिल २०२५ रोजी संपन्न होत असून त्या निमित्ताने ग्रामस्थ मंडळ शिहू च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिहू गावात वैकुंठवासी ह.भ.प जनार्धन मऱ्या घरत व वैकुंठवासी बाळाराम महादू म्हात्रे यांच्या प्रेरनेणे श्री. बहिरेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळा १ एप्रिल ते ३ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता श्रींच्या मूर्तीला अभिषेक ह.भ.प तुकाराम महाराज बुर्डीकर, यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे तदनंतर कलश पूजन,मूर्ती पूजन, ध्वजारोहन,दुपारी १ वाजता श्री. बहिरेश्वर महिला भजन मंडळ शिहू व श्री.मरीआई महिला भजन मंडळ अटीवली यांचे भजनाचे कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ जांबोशी पेण यांचा हरिपाठ,रात्री ९ वाजता ह.भ.प रामकृष्ण महाराज मोकल रायगड भूषण,महाराष्ट्र राज्य पुरस्कृत, समाज प्रबोधनकार मुंबई यांची कीर्तन सेवा होणार आहे.बुधवार दि. २ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अखंड हरी एकनाम सप्ताहाची सुरवात होईल,गुरुवार दि.३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी जन्मोत्सव सोहळ्याची पुष्पवृष्टी होईल.१ ते ४ तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल, रात्री ठीक ८ वाजता श्री.बहिरेश्वर व जोगेश्वरी मातेच्या पालखीची मिरवणूक संपूर्ण गावातून काढली जाईल तरी सर्वांनी पालखीचा आनंद घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ शिहू च्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अन्नदाते नागोठणे येथिल सिव्हिल कॉनट्रेक्टर नाझिमशेठ नालखंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. तर मिरवणुकीसोबत भजन सेवा पंचक्रोशीतील सर्व वारकऱ्यांचा सहभाग लाभणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025