दारू तस्करांकडून खांबाडा येथे बेली मिनरल वॉटर, देशी दारू सह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त.
दारू तस्करांकडून खांबाडा येथे बेली मिनरल वॉटर, देशी दारू सह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त.
दारू तस्करांकडून खांबाडा येथे बेली मिनरल वॉटर, देशी दारू सह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त.
दारू तस्करांकडून खांबाडा येथे बेली मिनरल वॉटर, देशी दारू सह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त.
दारू तस्करांकडून खांबाडा येथे बेली मिनरल वॉटर, देशी दारू सह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त.
✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर (वरोरा):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच बुधवार दि. २८ एप्रिल सांयकाळी ६.०० वाजताच्या सुमारास वरोरा पोलिसांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांबाडा चेक पोस्ट वर सापळा रचून दारू तस्करांकडून बेली मिनरल वॉटर, देशी दारू सह २९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्यामुळे चढ्या भावाने दारू विक्री करण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून देशी विदेशी दारूची चोरट्या पद्धतीने तस्करी सुरू आहे. पोलीस हवालदार प्रदीप पाटील  दुपारच्या  सुमारास कार्यालयीन कामाकरता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, वरोरा येथे आले असता नागपुर वरून मालवाहतूक करणाऱ्या अशोक लेलन्ड पिकअप वाहनातून बेलीे मिनरल वॉटरच्या खोक्याखाली  देशी दारूचा माल घेऊन  जात असल्याची माहिती मुखबिराकडून त्यांना मिळाली. याची सूचना लगेच त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांना दिली.  उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांनी याबाबत डी.बी. इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांना कळविले.
दुपारी ४ वाजताच्या सुमारास  बेलसरे, प्रदीप पाटील ,डीबी कर्मचारी व दोन पंचांना घेऊन खांबाड्याला गेले.तिथे कोव्हीड- १९ संबंधाने चंद्रपूर जिल्हा सीमा नाकाबंदीचा पोलिस स्टाफ उपस्थित होता. नाकाबंदी दरम्यान सायंकाळी ५.५८ वाजताच्या सुमारास मुखबिराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे अशोक लेलँड मालवाहतूक पिकअप गाडी पांढऱ्या आय- २० हुंडई कारच्या मागून  नागपूर रोड वरून चंद्रपूरच्या दिशेने येताना दिसली. चेक पोस्टवर थांबून त्याची तपासणी केली असता आय -२० हुंडई चारचाकी वाहन क्रमांक एम एच ४९ बीके ३०३५  मधील ड्रायवरकडे ५०० रुपयांचे दोन बंडल एकूण १ लाख रुपये व लोकेशन देण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल २० हजार रुपये व चारचाकी किंमत ७ लाख रुपये जप्त करून कार चालक निलेश सलोटे रा.वाठोडा, नागपूर याला ताब्यात घेतले. त्यानंतर  पिकअप क्र. एम.एच. o४ एटी २७०४ ची झडती घेतली असता, बेली कंपनीचे मिनरल वॉटर ५०० मि .ली. चे ३० बाक्स वर ठेऊन त्याचे खाली रॉकेट कंपनीचे ९० मिली .देशी दारूच्या बाटल्या बॅच नंबर १७९ मार्च २०२१ असे  लेबल लावलेले १५० बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये १०० नग एकुण १५०० ० नग बाटली किंमत १५ लाख रुपये आढळून आले . गाडी चालक मुख्य आरोपी राहील सलीम खाँ पठान १९, शेख जुबेर शेख गुलाब २ २, रंजीत चंद्रमणी मेश्राम २४ सर्व रा नागपूर यांचे कडून ३ मोबाईल फोन ३३ हजार, व पिकअप वाहन किंमत ६ लाख ,असा एकूण २९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी वरील घटनेबाबत मुख्य आरोपी राहील सह अन्य तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here