बरडकिन्ही गाव ठरतोय कोऱोना हॉटस्पॉट पंधरा-वीस दिवसात मृतांची संख्या वाढीवर
बरडकिन्ही गाव ठरतोय कोऱोना हॉटस्पॉट पंधरा-वीस दिवसात मृतांची संख्या वाढीवर

बरडकिन्ही गाव ठरतोय कोऱोना हॉटस्पॉट पंधरा-वीस दिवसात मृतांची संख्या वाढीवर

बरडकिन्ही गाव ठरतोय कोऱोना हॉटस्पॉट पंधरा-वीस दिवसात मृतांची संख्या वाढीवर
बरडकिन्ही गाव ठरतोय कोऱोना हॉटस्पॉट पंधरा-वीस दिवसात मृतांची संख्या वाढीवर

✒अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी✒
ब्रह्मपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यासह ब्रह्मपुरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक खेड्यातील गावामध्ये ग्रामपंचायती तर्फे दवंडी देऊन कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देऊन सुद्धा स्थानिक नागरिक याचा पालन करताना दिसत नसल्याने ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात कोरोणा रूग्णांत वाढ होत असल्याचे स्पष्ट चित्र लक्षात येत आहेत.

ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही (गांगलवाडी) येथे गेल्या पंधरा दिवसापासून तापाची साथ सुरू असून या गावात जवळपास 75% नागरिक तापाने फणफणत आहेत तर आज पर्यंत 12 ते 13 जवळपास नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राप्त माहिती उघडकीस आली आहे. बरड किन्ही येथील स्थानिक रहिवासी असलेले ब्रह्मपुरी पंचायत समितीचे सभापती रामलाल दोनाडकर यांनी गावाची परिस्थिती पाहता वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना करीत आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली पाच-सहा दिवसाआगोदर कोरोना चाचणी घेण्यात आली होती मात्र नागरिक ही चाचणी करण्यासाठी घाबरत धास्ती घेतल्यामुळे अनेक कुटुंबातील बाधित नागरिकांनी कोरोना टेस्ट केली नसल्याचे कळते. त्यामुळे दिवसेंदिवस या गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे शिवाय या गावात निर्जंतुकीकरण व्हावे या उद्देशाने सॅनिटायझर ची फवारणी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

वेळीच बरडकीन्ही गावात उपाययोजना करून दुसऱ्यांदा लसीकरण झाले नाही तर आणखी रुग्णांची वाढ होऊन मृत्यूचे थैमान वाढण्याची भीती नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या गावात प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया:

वारंवार गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी मी प्रवृत्त करत आहे मात्र बहुतांशी नागरिक हो म्हणतात मात्र चाचणीच्या वेळी कुठे राहतात हेच कळायला मार्ग नाही तरीसुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात गावात कॅम्प लावून प्रत्येक कुटुंबातील नागरिकांचीआरोग्य तपासणी करण्याचे माझे प्रयत्न आहेत.
रामलालजी दोनाडकर सभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here