महाराष्ट्रात माघील 24 तासात 828 रुग्णांचा मृत्यु तर 62919 नवीन कोरोना बाधित.

✒नीलम खरत,मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई:- महाराष्ट्र राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात 62 हजार 919 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 828 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या 46 लाख 2 हजार 472 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 68 हजार 813 रुग्णांचा कोरोना वायरसने मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 69 हजार 710 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 38 लाख 68 हजार 976 कोरोना वायरस बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.06% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे.