शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनची मदत.
✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- कुरखेडा रुग्णालयात कोरोना संसर्गाचे जवळपास 80 ते 90 रुग्ण भरती आहेत, ऑक्सिजन कमी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची फार आवश्यकता असते, कोरोना संसर्ग उपचारासोबत ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ऑक्सिजन उपलब्ध न राहिल्यास प्रसंगी रुग्ण मृत्यूमुखी पडू शकतो, हीच बाब ध्यानात घेऊन माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनात व किरणभाऊ पांडव यांचे सहकार्याने ऑक्सिजनची कमी पडू नये म्हणून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाला 100 ऑक्सिजन सहित सिलेंडर देण्याचे ठरविले असून 25 ऑक्सिजन सिलेंडरची पहिली खेप माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात, माजी नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबनसी, माजी तालुकाप्रमुख आशीष काळे, माजी शहरप्रमुख संजय देशमुख, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख, डॉक्टर अनील उईके यांच्या सहकार्याने उपजिल्हारुग्णालयाला आज दिनांक 30 एप्रिल 2021 ला देन्यात आले.
पुढे सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयाला मदत म्हणून ऑक्सिजन पुरवठ्याच्या मानस माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी सांगितले.