रायगड मध्ये 120 रुग्णांना दिलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन निघालं खराब; 90 रुग्णांवर दुष्परिणाम.

55

रायगड मध्ये 120 रुग्णांना दिलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन निघालं खराब; 90 रुग्णांवर दुष्परिणाम.

रायगड मध्ये 120 रुग्णांना दिलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन निघालं खराब; 90 रुग्णांवर दुष्परिणाम.
संग्रहीक फोटो

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई/रायगड,30 एप्रिल:- महाराष्ट्र राज्यात कोरोना वायरसचा प्रक्रोप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात रोज हजारो कोरोना वायरस बाधित रुग्ण समोर येत आहे. पुढिल एक महिना कोरोना वायरस बांधीत रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे. संपुर्ण महाराष्ट्र भयानक परिस्थिती असताना रायगड जिल्ह्यातून आरोग्य विभागाचा गलथान आणि हलगर्जी कारभार समोर आला आहे.

रायगड जिल्हात कोरोना वायरस बांधीत रुग्णांना देण्यात आलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची 28 एप्रिल रोजी रायगड जिल्हाला देण्यात आलेली कोविफॉरची HCL21013 ही बॅच खराब निघाल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. या खराब रेमडेसिव्हीर इंजेक्शन मुळे अनेक कोरोना वायरस बाधित रुग्णांना दुष्परिणाम दिसून आले आहे.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा राज्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे. त्यामूळे यांचा काळाबाजार पण मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. अशा भितीदायक परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांना खराब रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्यात आले. घडलेल्या या घटनेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यात आलेली रेमडेसिव्हीर इंजेक्शनची संपूर्ण बॅचच दुषित निघाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात 120 कोरोना रुग्णांना या बॅचचे इंजेक्शन देण्यात आले होते. यापैकी 90 जणांना याचे दुष्परिणाम जाणवू लागले होते. त्यावर डॉक्टरांनी त्वरित या रुग्णांवर उपचार करून त्यांना सुस्थितीत आणले आहे. परिणामी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने त्या बॅचच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्याबाबतचे आदेश जिल्ह्यातील रुग्णालयाला दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.