मुंबईतील जोगेश्वरी येथे 5 वर्षीय चिमूकलीवर बलात्कार. आरोपी मेडिकलच शिक्षण घेत होता.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.30 एप्रिल:- मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. आज भारतात लहान मुली पासुन ते 60 वर्षाच्या महिला सुरक्षित नाही अस अनेक घटना वरून समोर येत असते. अशीच एक धक्कादायक घट्ना समोर आली आहे. टि.व्ही बघायला गेलेल्या 5 वर्षीय चिमुकल्या मुलीवर एका नराधम तरुणाने बलात्कार केला.

मुंबईमधील जोगेश्वरी येथे रहाणा-या एका नराधम तरुणाने अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीला आपल्या हवस आणि विकृतीचं शिकार बनवल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

जोगेश्वरी परीसरातील बेहराम या भागात ही घटना आहे. पिढीत चिमुकलीचे कुटुंब नराधम आरोपीच्या घरातील वरच्या मजल्यावर किरायाने राहतात. 5 वर्षाची चिमुकली मुलगी रोज त्यांच्या घरी टि.व्ही बघायला जात होती. घर मालकाचा मुलगा अर्थात आरोपी नराधम हा मेडिकलचे शिक्षण घेतो. संबंधित आरोपीचं नाव सुनिल सुखाराम गुप्ता असं आहे.

गुरुवारी संध्याकाळी संबंधित मुलगी आपल्या घर मालकाच्या घरी रोजप्रमाणे टिव्ही पाहायला गेली. यादरम्यान, घरी फक्त आरोपी सुनिल होता. लहान मुलीच्या भोळेपणाचा फायदा घेत सुनिलने ती घरी आल्यानंतर काही वेळाने घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर सुनिलने 5 वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलगी रडत घरी गेल्यावर आईने विचारणा केली. यावेळी मुलीने संपुर्ण प्रकार सांगितला.

दरम्यान, संबंधित 5 वर्षाच्या मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी सुनिलला अटक देखील केली आहे. मात्र सर्वत्र याबाबत संताप असल्यामुळे स्थानिकांनी सुनिलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here