उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आ. कुणावार यांनी कोविड-19 भरती असलेल्या पेशंट बाबत आढावा बैठक.

प्रा. अक्षय पेटकर वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.29 एप्रिल:- येथे कोविड-19 रुग्णांना ट्रीटमेंट करीत असताना येणाऱ्या अडचणी विषयी चर्चा करण्यात आली असून याठिकाणी दवाखान्याला औषधे आणि इंजेक्शनचा साठा किती प्रमाणात उपलब्ध आहे व किती अपुरा आहे याविषयी चर्चा होऊन रुग्णालयांमध्ये इंजेक्शन व औषधी चा साठा तातडीने उपलब्ध होण्या विषयी चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे पेशंटचा होत असलेला उपचार, दवाखान्यातील मृत्यू दर, त्या ठिकाणी असलेला ऑक्सिजन चा साठा इत्यादी विषयावर आढावा घेण्यात आला आणि दवाखान्या संबंधी काही अडचणी सांगितल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असून या संदर्भात वरिष्ठांना पत्र देऊन काही विषयी फोन द्वारे त्यातून तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे आमदार समीर कुणावार यांनी अभिनंदन केले. चांगले काम येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व टीम करीत असून याला डॉ. चाचारकर, नायब तहसीलदार डॉ. शकुंतलाताई पाराजे, डॉ. भोयर, डॉ. डागा, डॉ. विजय कुणघटकर, डॉ. मिसाळ, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीराम मुंधडा इत्यादी सर्व मदत करीत आहे.

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आढावा घेऊन दवाखान्यातील डॉक्टरांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे आमदार समीर कुणावार यांनी सुचविले.

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील अनेक रुग्ण आता बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळत असून अनेक गंभीर रुग्णांना सेवाग्राम आणि सावंगी हॉस्पिटल मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेफर करण्यात आले असून अनेक रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे रुग्णांची ट्रीटमेंट देण्यात येत असून रेमडीसीवर सुद्धा इंजेक्शन या उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपलब्ध होत आहे त्याबद्दल आमदार समीर कुणावार यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here