वनविभागाचे अधिकारी झाले रेतीतस्करांचे साथीदार
वनविभागाचे अधिकारी झाले रेतीतस्करांचे साथीदार

वनविभागाचे अधिकारी झाले रेतीतस्करांचे साथीदार

गुन्हेगाराला साथ देणे हा गुन्हा असून साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवा: जनतेची मागणी

वनविभागाचे अधिकारी झाले रेतीतस्करांचे साथीदार
वनविभागाचे अधिकारी झाले रेतीतस्करांचे साथीदार

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- वन विभागाच्या निष्काळजीपणा व वनाधिकारी यांच्या आशीर्वादाने राजुरा वनविभागीय नर्सरीला लागून असलेल्या नाल्यातून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. या परिसरात रेती तस्करांनी अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती साठवून ठेवल्याची माहिती आहे. आज घडीला नाले रेतीमुक्त झाल्याचे समजते.

या ठिकाणाहून दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर राजरोसपणे रेतीची चोरी करीत असून यावर कोणाचाही वचक नाही. रेती तस्कर मुक्तपणे हा व्यवसाय करीत असून त्यांना वन विभागातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याची परिसरात चर्चा आहे. रेती तस्करांचे वन विभाग व विभागातील अधिकारी लोकांशी अर्थपूर्ण असलेले संबंध रेती चोरांचे मनोबल वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच रेती तस्करांचा बंदोबस्त करून या बिटातुन चोरी जात असलेल्या रेतीची तस्करी लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे केली जात आहे. रेती तस्करांविरुद्ध वेळीच उपाययोजना न केल्यास वन विभागातील अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here