हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा, कारवाई करण्याची जनतेची मागणी.
हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा, कारवाई करण्याची जनतेची मागणी.

हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा, कारवाई करण्याची जनतेची मागणी.

हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा, कारवाई करण्याची जनतेची मागणी.
हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा, कारवाई करण्याची जनतेची मागणी.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट/वर्धा:- एकीकडे संपुर्ण राज्यासह देशामध्ये जागतिक महामारी ठरलेल्या करोनाचा हाहाकार माजलेला असतांना तर दुसरीकडे वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात मोठया प्रमाणावर वाळू उपसा होत असून प्रामुख्याने हिंगणघाट तालुक्यातील नदी घाट येथे शासकीय लिलावातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असून त्यावर आर्थिक स्वार्थापोटी काही अधिकारी जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याची जनते मध्ये चर्चा आहे. अशा लोकावर आणि अधिका-यावर कारवाई करून वाळू लिलाव त्वरित बंद करण्याची मागणी जनते मधून समोर येत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील वणा आणि इतर नदीतून वाळू उपसा करण्याचा लिलाव झाला असून तो ठेका घेणाऱ्यांनी आज पर्यंत नदी पात्रात अनाधिकृत जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर व इतर मशिनरीच्या सहाय्याने दररोज जवळपास शेकोडोच्या वर ढंपर वाळू उपसा केला आहे. हा अनाधिकृत वाळू उपसा काही भष्ट्र अधिकारी यांच्याशी आर्थीक संगनमत करून केला आहे. त्यामुळे शासनाला मिळणा-या महसुलाचे प्रचड नुकसान झाले आहे. लिलाव धारकाने या अधिका-याशी संगनमत करून लिलावामध्ये नमुद केलेल्या पैकी जवळपास 100 पट वाळू उपसा केला आहे. वाळू माफियांना येथील बड्या राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे स्थानिक प्रशासन देखील याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे.

संपूर्ण राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे तर वर्धा जिल्हा रेड झोन मध्ये असून हिंगणघाट तालुक्यात 24 तास नदीतून वाळू उपसा सुरू आहे. करोना महामारीचा धोका तिथून वाढू शकतो त्यामुळे प्रशासनाने त्यात तातडीने लक्ष घालून सदर ठेका बंद करावा तर किती वाळू उपसा झाला याचे मोजमाप भुजल सर्वेक्षण कार्यालय किंव्हा भूमापन कार्यालय अथवा सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन करण्यात यावे तसेच लिलावा मध्ये नमुद केलेल्या पेक्षा किती जास्त वाळू उपसा झाला असल्यास सदर लिलाव धारकाचे डिपॉझिट तात्काळ जप्त करावे व दंडात्मक कार्यवाही नियमा प्रमाणे करावी तसेच जास्तीचे वाळू उपसा करणाऱ्या वाळू ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी व याला जबाबदार असलेले स्थानिक अधिकारी व प्रांताधिकारी यांच्यावर तरीत करवाई करण्याची देखील मागणी हिंगणघाट तालुक्यातील जनतेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here