अवैध देशी दारूसाठा जप्त 9 लाख सात हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त, चिमूर पोलिसांची धडक कारवाई.
त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- पोलीसांना शनिवार ला रात्रो तिन वाजता च्या दरम्यान महींद्रा स्कार्पीओ ने अवैध दारूची वाहतुक गदगाव चिमूर मार्गाने होत असल्याची गुप्त माहीती मिळाली त्यानुसार चिमूर येथील एमआयडीसी परिसरात पोलीसांना स्कार्पीओ दिसताच पाठलाग केला मात्र स्कार्पीओतील वाहन चालक पोलीसांना पाहताच गाडीला उभे करून जंगलाच्या दिशेने पळून गेले पोलीसांनी गाडीसह नऊ लाख सात हजार दोनशे रुपयाचा अवैध देशी दारुचा मुद्दे माल जप्त केला.
दरम्यान पोलीसांनी बत्तीस बाक्स मध्ये एकून १ हजार पाचशे छत्तीस देशी दारुने भरलेल्या प्रत्येकी १८० मिली मापाच्या शिशा किमंत ३ लाख सात हजार व एक जुनी वापरती महींद्रा स्कार्पीओ चार चाकी वाहन किमंत ६ लाख रुपये असा एकुन ९ लाख सात हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीसांनी फरार चालक व मालकाविरुद्ध कलम ६५ (अ) ८३ मदाका नुसार गुन्हा नोंद करन्यात आला. हि कार्यवाही पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे विलास निमगडे कैलास आलाम भरत पुसांडे सचिन खामनकर कुनाल गाठोड यांनी केली आहे.