वर्धा सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नाही, पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.

45

वर्धा सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नाही, पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.

वर्धा सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नाही, पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.
वर्धा सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नाही, पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.

 

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा दि. 30:-  धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे 17 हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते. पण सध्या येळाकेळी येथील धाम नदीचे पात्र बजाज फाऊंडेशनच्या मदतीने वर्धा पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील अर्ध्या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वर्धा नगरपालिका प्रशासनाने केले आहे. वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 27 मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार 28 मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम पूर्ण केले जात आहे. धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच ती स्वच्छ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सुनील रहाणे, वर्धा नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नीलेश नंदनवार आदींनी येळाकेळी गाठून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांनाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

तीन दिवसांत किमान 25 हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.- सुनील रहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा. 

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून गाळ काढल्या जात असल्याने पुढील तीन दिवस वर्धा शहरातील अर्ध्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. – नीलेश नंदनवार, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, न.प. वर्धा.