तेलंगणा राज्यातील मालमत्तेविरुध्द दाखल ३७ गुन्हयातील आरोपींना माणगांव पोलीसांनी केले गजाआड

तेलंगणा राज्यातील मालमत्तेविरुध्द दाखल ३७ गुन्हयातील आरोपींना माणगांव पोलीसांनी केले गजाआड

तेलंगणा राज्यातील मालमत्तेविरुध्द दाखल ३७ गुन्हयातील आरोपींना माणगांव पोलीसांनी केले गजाआड

तेलंगणा राज्यातील मालमत्तेविरुध्द दाखल ३७ गुन्हयातील आरोपींना माणगांव पोलीसांनी केले गजाआड

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-तेलंगणा राज्यातील चोरी, दरोडा, जबरीचोरी, घरफोडी अश्या एकुण ३७ गुन्ह्यातील आरोपींना माणगांव पोलीस ठाण्यातील रायगड पोलीसांनी माणगांव रेल्वे स्टेशन येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करत धाडसी कारवाई करीत आरोपींना जेरबंद करुन तेलंगणा राज्य पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.पोलीसांकडुन प्राप्त माहीतीनुसार सविस्तर वृत्त असे कि पहाडीशारीफ पोलीस ठाणे कॉ.गु.र.नं. २८२/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३९२ प्रमाणे हा गुन्हा दिनांक २४ मे २०२४ रोजी ०५.५० वाजताचे सुमारास मौजे मनकलगाव ता. महेश्वरम जि. रचिकोंडा राज्य तेलंगणा येथे घडला असुन तो दिनांक २४ मे २०२४ रोजी ०८.०० वाजता दाखल आहे. या गुन्हयातील फिर्यादी श्रीमती गडडमेदी कल्पना महेंदर हे मॉर्निंग वॉक करीता गेले असता त्यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेली आहे. असे दिलेल्या तक्रारी वरुन सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील आरोपी १) धनला बाबु बालाजी गायकवाड ग.मुबाराक नगर, निजामबाद मुळ रा.खारपुर ता. देगलुर जि. नांदेड व २) समशेर सिंग चतुरसिंग टाक रा. बिचुकूंडा निझामाबाद राज्य तेलंगणा हे सदर गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तित्व लपुन इतर राज्यामध्ये फिरत असुन त्यांचेवर तेलंगणा राज्यात मालमत्ते विरुध्द चे गुन्हे (चोरी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी) असे एकुण ३७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याबाबत संबधीत पोलीस ठाणे कडुन माहिती प्राप्त झाली होती.

या गुन्ह्यांचे गांभीर्य पाहता रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्त्वा खाली पोलीस ठाणे स्तरावर पथके तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने हद्दीत गस्त देखील वाढविण्यात आली होती. त्यावरुन नमुद गंभीर गुन्हयातील आरोपी हे माणगांव रेल्वे स्टेशन येथे असल्याची बातमी गोपनिय बातमीदारा मार्फत मिळाल्याने त्या ठिकाणी तात्काळ तयार करण्यात आलेल्या तपास पथकांनी सापळा रचुन आरोपींचा फिल्मी स्टाईल ने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबधीत आरोपी यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल असल्याची कबुली दिल्याने आरोपींना पहाडीशारीफ पोलीस ठाणे जि. रचिकोंडा राज्य तेलंगणा येथिल पोलीस तपासिक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची धाडसी कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व माणगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांचे अधिपत्याखाली माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पोहवा/७०९ रावसाहेब कोळेकर, पोशि/१९०५ डोईफोड, पोशि/३९९ माटे, पोशि/४८८ पाटील, पोशि / ८२५ बोरकर, पोशि/१३४४ पवार हे पुढील तपास करीत आहेत.