गिरणी संघटनातील फुटीने कामगारांना अद्याप घरे नाहीत राजकारण संतप्त काहींना हवे मोफत, तर काहींना सवलत….

गिरणी संघटनातील फुटीने कामगारांना अद्याप घरे नाहीत राजकारण संतप्त काहींना हवे मोफत, तर काहींना सवलत....

गिरणी संघटनातील फुटीने कामगारांना अद्याप घरे नाहीत राजकारण संतप्त काहींना हवे मोफत, तर काहींना सवलत….

गिरणी संघटनातील फुटीने कामगारांना अद्याप घरे नाहीत राजकारण संतप्त काहींना हवे मोफत, तर काहींना सवलत....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

कोकण :-महाराष्ट्र राज्य सरकारने उपनगरात सरकारी जमिनीवर घरे मोफत नव्हे परंतु परवडणाऱ्या दरात देण्याचे फक्त आस्वासन दिले असले तरी घरे मिळविण्याचा एकच ध्येय असताना काही गिरणी कामगार संघटना मोफत घर आहेत तर काही गिरणी कामगार संघटना वाजवी दरात मागत आहेत मात्र या संघटना एकत्र तोडगा न काढता राजकारण करत असल्याने आम्हाला मुंबईत आमचे हक्काचे घर मिळावे भविष्यातही शक्य वाटतं नाही असे सामान्य गिरणी कामगारांना वाटत आहे.गेल्या 21 वर्षात आजपर्यंत केवळ 15 हजार 874 घराची सोडत म्हाडा मार्फत काढण्यात आली आहे यापैकी 9 हजार 570 कामगारांना घराचा ताबा मिळाला तर 6 हजार 301 जणांना घराचा ताबा मिळालेला नाही म्हाडाकडे सुमारे 1 लाख 74 हजार 332 कामगार आणि वारसानी नोंदणी केली असून त्यांना घर देण्यासाठी किती वर्ष अजून काढावी लागतील ? असा सवाल गिरणी कामगाराच्या वारसानी केला आहे.गिरणी कामगारांना घरासाठी जमीन राखीव दयावी अशी मागणी पुढे आली तेव्हा निवडक गिरणी मालकांनी असलेल्या जागेपैकी काही जमीन शाशनाकडे सोपावली पण बऱ्याच गिरण्याची जमीन मालकांनी शासनाला म्हाडाला परत केलेली नाही त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरासाठी लढा सुरूच राहणार.

गिरणी मालक हे केवळ त्या गिरणीचे मालक आहेत त्या गिरणी ज्या जागेवर उभ्या आहेत ती जागाच नव्हती यावर उपाय म्हणून सुरुवातीला गिरण्याच्या जमिनीचे मालक कामगार आणि सरकार असे तीन हिस्से करण्यात आले होते बहुतास गिरण्या असलेल्या जागा राज्य शाशन व पालिकेच्या मालकीच्या होत्या त्याकाळी उद्योग सुरु करण्यासाठी त्या किरकोळ पैसे घेऊन भाडे तत्वावर देण्यात आल्या होत्या असे गिरणी कामगार वारस प्रशांत मोरे यांनी सांगितलं आहे. मागील कित्येक वर्षांपासून गिरणी कामगार हक्काच्या घराची प्रतीक्षा करीत आहेत. राज्य सरकारने काही कामगारांच्या वारसाना घरे दिली आहेत परंतु अद्यापही बहुतांश गिरणी कामगार व त्याच्या वारसाच्या मागे घरासाठी लागलेली शुल्ककाष्ट अजून संपले नाही सामान्य गिरणी कामगारची भूमिका माडताना प्रशांत काशीराम मोरे रा. उमरोली ता माणगांव जि. रायगड यांनी सामान्य गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी यासाठी खंत व्यक्त केली आहे एक लाख पंच्यातर हजार घराचा लांबचा पल्ला गाठेपर्यंत हा म्हातारा गिरणी कामगार जिवंत राहील की नाही ही बाब सरकारने ध्यानात घेऊन लवकरात लवकर गिरणी कामगारांना घरे मिळवून द्या असं प्रशांत मोरे यांनी म्हटलं आहे जर कां आमची बाब समजून घेतली नाही तर येत्या काही दिवसात मंत्रालय समोर बसून आमरण उपोषण करू असं म्हटलं आहे.