मुंबई हून महाबळेश्वर ला निघालेल्या पती पत्नी मध्ये वाद , बायकोचे तोडले दात…

मुंबई हून महाबळेश्वर ला निघालेल्या पती पत्नी मध्ये वाद , बायकोचे तोडले दात…

हिरामण गोरेगावकर

मुंबई :- महाबळेश्वरला निघालेल्या पती आणि पत्नीमधील क्षुल्लक वादामुळे नवऱ्याने त्याच्या बायकोला तोंडावर ठोसा मारला. यामुळे त्याच्या बायकोचे दोन दात गाडीतच पडून ती जखमी झाल्याचं समोर आलंय.
मुंबईतील दाम्प्त्यामधील वादामुळे पत्नीचे दात तोडले
गाडीतील क्षुल्लक कारणीवरुन पत्नीच्या तोंडावर पतीने मारला ठोसा
महिलेने पतीविरुद्ध केली तक्रार दाखल
खरंतर, संसार म्हटला तर भांड्याला भांडं लागणं आलंच, अशी म्हण आपण नेहमी ऐकतो. तसेच नवरा आणि बायकोमधील भांडणाच्या घटना सुद्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मात्र, बऱ्याचदा अशा नवरा आणि बायकोमधील असा किरकोळ वादांमुळे मोठे परिणाम घडल्याच्या सुद्धा बातम्या समोर येतात. मुंबईमधील एका दाम्प्त्यामध्ये अशीच काहीशी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावेळी महाबळेश्वरला निघालेल्या पती आणि पत्नीमधील क्षुल्लक वादामुळे नवऱ्याने त्याच्या बायकोला तोंडावर ठोसा मारला. यामुळे त्याच्या बायकोचे दोन दात गाडीतच पडून ती जखमी झाल्याचं समोर आलंय. 
नेमकं काय घडलं? 
मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी असलेलं एक जोडपं महाबळेश्वरला गाडीतून फिरण्यासाठी निघालं होतं. गाडीतून जात असताना गाडीतील एसी चालू बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. मात्र या वादात नवऱ्याने त्याच्या बायकोच्या तोंडावर जोरात ठोसा मारला आणि यादरम्यान महिलेचे दोन दात गाडीतच पडून ती जखमी झाली. 
ही घटना वाशी टोलनाका मार्गावर घडली असल्याची माहिती मिळाली आहे. खरंतर, एका बुक्कीत दात पाडल्याचं ऐकून अनेकांना ही गंमतीशीर बाब वाटत असली तरी नवरा आणि बायको मधील क्षुल्लक कारणावरून झालेला वाद हा मारामारी पर्यंत पोहोचू शकतो, हे या घटनेतून समजत आहे .या प्रकरणी पीडित महिलेने आपल्या पती विरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे , पोलीसही या तक्रारीची दखल घेत कारवाई करण्यासाठी धाव घेतली आहे .पत्नीने आपल्या पती विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे पोलसानी गुन्हा दाखल केला आहे आणि तो वाशी वाशी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे..