खळबळजनक: 14 व्या मजल्यावरून उडी मारून एका मॉडेलची आत्महत्या.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई, 29 जून:- कोरोना वायरसच्या महामारीमुळे संपुर्ण जग भयाखाली आहे. अनेक लोक या मुळे बेरोजगार झाले. अनेक उघोग आणि व्यवसाय बंद पडले या महामारीचा फटका चित्रपटसृष्टीलाही मोठा प्रमाणात बसला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या लॉकडाउनमुळे सध्या शूटिंग बंद आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे अनेक कलाकारांकडे सध्या काम नसल्यानं त्यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागत आहे. त्यातून आत्महत्या करण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या काही काळात अभिनय क्षेत्रातील अनेक लहानमोठ्या कलाकारांनी आत्महत्या केली आहे. या यादीत आता नोएडातील प्रिया उर्फ भावना गौतम हिच्या नावाची भर पडली आहे. भावनानं सोमवारी रात्री उशिरा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. ती एक मॉडेल होती.
प्राप्त माहितीनुसार, ‘रविवारी रात्री तिचा बॉयफ्रेंड मुंबईहून आला होता, त्याच्यासोबत तिनं पार्टी केली होती, त्यावरून तिची आई तिला रागावली होती. त्यामुळं भावना नाराज झाली होती. सोमवारी तिनं आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्यावेळी तिच्या आईनं तिला समजावलं होतं; मात्र नंतर अचानक तिनं आत्महत्या केली’.
24 वर्षांची भावना गौतम गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अभिनय, मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यासाठी संघर्ष करत होती, मात्र तिला बराच काळ काहीही काम मिळालेलं नव्हतं. त्यामुळं ती निराश झाली होती. सध्या काम बंद असल्यानं ती काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडात बिसरख पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रेनो वेस्ट भागातील परामाउंट इमोशन्स सोसायटीत राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आली होती. तिची बहीण या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहते. इथंच भावनानं रविवारी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पार्टी केली. त्यावरून तिची आई तिला ओरडली होती. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा भावना सोसायटीच्या 14 व्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारून तिनं जीव दिला.