*आणीबाणीतील शहीदच्या कुटुंबियांचा भाजपा राजुरा तर्फे सत्कार*
*राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व सुदर्शन निमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती*

*राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व सुदर्शन निमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती*
✒ संतोष मेश्राम✒
राजूरा तालुका प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो नं 9923497800
1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर संकटात आलेल्या आपल्या सत्तेला वाचवण्यासाठी लोकशाही मूल्यांची हत्या करून आणीबाणी लागू केली.रा.स्व. संघाच्या व विरोधी पक्ष्याच्या अनेक नेत्यांना कारगृहात टाकण्यात आले.ह्या काळ्या निर्णयाच्या स्मरणार्थ आज भाजपा राजुरा तर्फे आज काळा दिवस पाळण्यात आला.व आणीबाणीत तुरुंगावास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
ह्याच अनुषंगाने राजुरा येथील आणीबाणीत कारावास भोगलेल्या व कारगृहातून सुटका होताच दुसऱ्या दिवशी निधन झालेल्या रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंमसेवक असलेल्या स्व. बाबुरावजी देशमुख ह्यांच्याशी कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.स्व.बाबूरावजी ह्यांचे नातू व संघांचे तालुका कार्यवाह श्री प्रदीप देशमुख ह्यांचा सहपत्नी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर ह्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.ह्यावेळी मान्यवरांनी स्व बाबूरावजी ह्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. बाबुराजींचे नातू प्रदीप देशपांडे ह्यांनीही त्यांच्या आजोबांच्या कारगृहातील आठवणीना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस प्रशांत घरोटे ह्यांनी केलं.
ह्याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमूख,तालुका सरचिटणीस प्रशांत घरोटे,तालुका सरचिटणीस दिलीप वांढरे,आदिवासी नेते वाघूजी गेडाम,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,तालुका युवा मोर्चा सरचिटणीस रवि बुरडकर, नगरसेविका श्रीमती उज्वला जयपूरकर,सौ प्रीती रेक्कलवार,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पिंगे,कैलास कार्लेकर, जनार्दन निकोडे,मंगेश श्रीराम,प्रशांत साळवे,सुधाकर देशमूख संदीप मडावी,ह्यांची उपस्थिती होती.