धाबा पोडसा मार्ग पाण्याखाली ..परीणामी वाहतूक झाली ठप्प

राजू झाडे
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी : -तालुक्यातील धाबा – पोडसा मार्गावरील फूलाचे बांधकाम सुरू आहे .. वाहतुकीसाठी तात्पुरती मार्ग बणवीण्यात आला मात्र आज दीनांक ३० जून रोज बुधवारला झालेल्या दमदार पावसामुळे सकमूर गावाजवळील फुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे परीनामी वाहतूक ठप्प झाली अवघ्या पंधरा दिवसांत तीसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला आहे गोंडपीपरी तालूक्यात विविध भागात रस्ते काम सुरू आहे अशातच आज ३० जून बुधवारला झालेल्या मुसळधार पावसाने बांधकाम सुरू असलेल्या व वाहतूकीसाठी तात्पुरती बांधण्यात आलेला फुल सूद्दा पाण्याखाली आल्याने सदर मार्ग बंद झाला आहे कामानिमित्त तालूकाच्या ठिकाणी आलेल्या नागरीकांची सदर मार्ग बंद झाल्याने मोठी फजीती झाली आहे