जालना जिल्हात घराच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्याची हत्या

49

जालना जिल्हात घराच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्याची हत्या

जालना जिल्हात घराच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्याची हत्या
जालना जिल्हात घराच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्याची हत्या

सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी

जालना,दि.29 जुन:- जालना जिल्हतील घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घराच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्याची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. कैलास गोविंद चव्हाण वय 48 वर्ष असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथील मयत कैलास गोविंद चव्हाण यांनी गावालगत असलेल्या नंदू नागोसिंग पवार यांचे घर विकत घेतले होते. हे घर विकत घेण्यास घरमालकाचा चुलत भाऊ राजू बाबूसिंग पवार व बाबूसिंग शंकरसिंग पवार यांचा विरोध होता. यावरून कैलास चव्हाण व राजू पवार, बाबूसिंग पवार यांच्यात नेहमी वाद होत होता या वादाचे परीवसन हत्यामध्ये झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास राणी उंचेगाव ते परतूर रस्त्यावरील एका टपरीजवळ कैलास चव्हाण व राजू पवार, बाबूसिंग पवार यांच्यात हाणामारी झाली. राजू पवार याने कैलास चव्हाण यांच्या डोक्यात फावड्याने वार केले. यात चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. याची माहिती नातेवाइकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नातेवाईक येताच, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मयताचा भाऊ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयित राजू पवार व बाबूसिंग पवार यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सपोनि. पतंगे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी केली.