*राज्य लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा,नियुक्त्या,मेगाभरती,पोलीसभरती व सरळसेवा भरती लवकरात लवकर घ्या.अन्यथा रस्त्यावर उतरू* – सुनील रत्नाकर भोयर; आप चंद्रपूर

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
9834024045
30june….. कोरोना Covid -19 चा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण व अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती, परीक्षा ,नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील 2-3 वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडने, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक,आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. ह्या सर्व बाबी राज्याच्या दृष्टीकोनातून घातक आहेत. युवक,विद्यार्थी असा बेजार होत असेल तर राज्याची प्रगती सुद्धा खुंटेल.
महोदय मागील 3 वर्षांपासून जून 2018 ते जून 2021 या कालावधीत राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 6 ऐवजी 2 अशी आहे.मागील सरकारने आणि आपल्या सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे निर्णय प्रक्रिया संथ झाली व आयोगाच्या अधिकारांवर गदा आली.MPSC ही संविधानिक संस्था असून सुद्धा सरकारची बाहुली बनून काम करत आहे हे लोकशाहीच्या स्वास्थासाठी घातक आहे.
3 वर्षांपासून पोलीस भरती नाही विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे, मागच्या सरकारने महापरिक्षा पोर्टल मार्फ़त मेगाभारती घेतली त्यात अनेक घोटाळे झाले त्यामुळे आपल्या सारकारने पोर्टल बंद केले त्याचप्रमाणे आपल्या सरकारमधील आरोग्य भरतीत सुदधा अनेक घोटाळे उघडकीस आलेले. गरीब विद्यार्थी मेहनत करत सरकारी नोकरीचे स्वप्न बघत आहे परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे हे विद्यार्थी मागे पडतात व ज्यांच्याकडे पैसे आहेत असे विद्यार्थी 10 ते 20 लाख रुपये देऊन नोकऱ्या घेत आहेत. हे भयावय आहे विद्यार्थी युवक हवालदिल होत आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्व प्रकारचे कामे सुरू, राज्यकर्त्यांना कुठलीही अट नाही, राजनेतीक पार्ट्यांना बंधने नाहीत परंतु विद्यार्थ्याच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे.
*खालील मागण्या राज्य शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात.*
*1)* MPSC राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 6 असायला पाहिजे परंतु मागील 3 वर्षांपासून दोनच सदस्य MPSC चा डोलारा सांभाळत आहेत. येत्या 10 दिवसात संपुर्ण सदस्य भरले जावेत.
*2)* MPSC आणि महाआईटी च्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावीत
*3)* स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या 3600 विद्यार्थ्यांच्या मुलाखती लवकरात लवकर घ्याव्यात
*4)* रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्त्या
द्याव्यात.
*5)* राज्य सरकारच्या वर्ग 3 व 4 च्या सर्व परीक्षा खाजगी कंपनीकडून न घेता, MPSC मार्फतच घ्याव्यात.तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्णवेळ नोकऱ्या द्याव्यात.
*6)* मागील 3 वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही. येत्या 10 दिवसात पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी.
*7)* येत्या 10 दिवसात सरळसेवा व मेगाभारती साठी अधिसूचना जारी करावी.
*8)* कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे दोन वर्षे फुकट गेले त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपू शकते त्यासाठी वयोमर्यादेत 2 वर्षाची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा.
*9)* ‘महाआईटी’ या सरकारी कंपनी वर SIT लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
*वरील मागण्या घेऊन आप चंद्रपूर महानगर आज मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर द्वारा मा.मुख्यमंत्री,मा. उपमुख्यमंत्री,मा. पालकमंत्री, मा. प्रधान सचिव तसेच मा.अध्यक्ष राज्य लोकसेवा आयोग यांचे कडे मांडण्यात आल्या.* जर या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 10 दिवसात महाराष्ट्रभर हजारो विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.असा इशारा आप चंद्रपूरचे श्री सुनील रत्नाकर भोयर यांनी प्रशासनाला यावेळी दिला.तेव्हा आप युथ विंग चे श्री मुकेश वरारकर ,शहर सचिव श्री राजू कुडे,सोशल मिडिया हेड श्री राजेश चेडगूलवार,सहसचिव श्री अजय डुकरे, सहसंयोजक श्री योगेश आपटे, चंद्रपूर ग्रामीण चे भद्रावती तालुका अध्यक्ष श्री सोनल पाटील,विद्यार्थीनि कु कोमल वानखडे, कु श्रावस्ति तावाडे, विद्यार्थी श्री राहुल आक्केवार, राहुल कोळसे, श्री कालिदास कोटके,श्री वामनराव नांदूरकर, श्री मधुकरराव साखरकर, श्री दिलीप तेलंग ,श्री सिकंदर सांगोरे ,श्री बबन कृष्णपल्लीवार,सौ देविका देशकर, श्री आश्रफभाई, श्री संदीप तुरक्याल, कोषाध्यक्ष श्री अशोक आनंदे इत्यादींची उपस्थिती होती.