सदोष बंधाऱ्यावरील. रपट्याचा ऊतार ….हीवरा येथील प्रकार

✒ राजू झाडे ✒
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी: -कुषी विभागाने हीवरा नाल्यावर बंधारा बांधला नाल्याचे पाणी बंधार्याने अडवीले मात्र शेतकऱ्यांचा पांदन रस्ता पाण्याखाली आला शेतकरी ओरळ केल्यानंतर कुषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधारा बांधकाम करण्याऱ्या ठेकेदाराला रपटा बांधायला सांगितले नाल्याला पूर आल्यानंतर हा बंधारा तग धरू शकणार का याबाबत शेतकरी साशंक आहेत
गोंडपीपरी तालूक्यात येणाऱ्या हीवरा येथील नाल्यावर आठ लाख रुपयांचा बंधारा बांधकाम ला मंजुरी मिळाली मात्र बंधारा बांधकाम ची जागा चूकीची ठरली पहिल्या च पावसात बंधाऱ्याने पाण्याचा विसर्ग अडवीला ..अडवीलेल्या पाण्यातून शेतकरी ये जा करणारा पांदन रस्ता पाण्याखाली आला शेतीचे कामे सुरू असल्याने तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढत होते याबाबत कुषी विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ शेतकरी समस्या मांडली ज्या ठेकेदारांनी बंधारा बांधला त्यांना रपटा बांधण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या मूरूम टाकून हा रस्ता बणवीला गेला आहे ..मात्र नाल्याला पूर आल्यानंतर हा रपटा तग धरू शकणार नाही ..हीवरा गावातील जवळपास शंभर शेतकरी या मार्गाने ये जा करतात