सातारा जिल्हात खळबळ: महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यास पोलिसांनी केल अटक.

55

सातारा जिल्हात खळबळ: महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यास पोलिसांनी केल अटक.

सातारा जिल्हात खळबळ: महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यास पोलिसांनी केल अटक.
सातारा जिल्हात खळबळ: महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यास पोलिसांनी केल अटक.

सातारा जिल्हा प्रतिनिधी

सातारा,दि.30 जुन:- सातारा जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संतापाची लाट पसरली आहे. एका महिला शिक्षिकेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन विविध कारणांवरून नाहक त्रास देत जवळीक साधून विनयभंग करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यास पोलिसांनी सोमवारी रुग्णालयातून ताब्यात घेत अटक केली.

सातारा तालुक्यात कार्यरत असलेल्या या शिक्षिकेने या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. यानुसार धुमाळ याला ताब्यात घेत अटकची करण्यात आली होती. धुमाळ याने प्रकृतीबाबतची तक्रार नोंदवली. यानुसार धुमाळ याला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी त्याची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सातारा तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक अभिजित धुमाळ हे करीत आहेत.

सातारा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्या नंतरही प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना माहिती देण्यात आली नव्हती. ही माहिती सोमवारी सकाळी समजल्यावर त्यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावत सर्वाना फैलावर घेतले. महिला शिक्षिकेने आपली तक्रार सुरवातीला प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे केली. कोळेकर यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी ही तक्रार विशाखा समितीच्या अध्यक्षा गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे पाठवली. विशाखा समितीच्या अहवालाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी संबंधितांना विचारणा केली. त्यावर सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्याची चौकशी करून त्याचा तत्काळ अहवाल देण्याचे आदेश गौडा यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना दिले आहेत.