उडान’ उपक्रमात कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

52

‘ *उडान’ उपक्रमात कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

उडान' उपक्रमात कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*
उडान’ उपक्रमात कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

अमरावती: – ‘उडान’ उपक्रम बंदीजनांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा असून, त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला.

अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

कारागृहात बंदीजनांतील कारागीर, कलावंताच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून अनेकविध सुंदर वस्तू व कलाकृतींची निर्मिती होते. या वस्तूंच्या विक्रीसाठी हे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्जनशीलतेला वाव देऊन सकारात्मकता पेरणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नाविन्यपूर्ण योजनेत सुमारे 50 लाख निधीतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. तिथे बंदीजनांनी निर्माण केलेल्या अनेकविध वस्तू
विक्रीसाठी उपलब्ध आहेत.