ना ना मुंदडा विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
*🪀7350050548📞*
वाशिम /मालेगाव
वाशीम : – ना ना मुंदडा विद्यालयात आज दिनांक 29 जून 2022 प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुनील राठी उपमुख्यध्यपक डॉ राधेश्याम जी पंपालिया पर्येवेक्षक दिनेश उंटवाल सौ संध्या उंबरकर मंचावर उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी तसेच पालक प्रतिनिधी म्हणून शेतकरी सोसायटी चे उपाध्यक्ष संतोष घुगे संदीप गौरकर योगेश वाघ लाभले होते
सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व नारायणदास मुंदडा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन औक्षण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच नवीन सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, यानंतर विद्यार्थ्यांचा सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. व शाळेचा पहिला दिवस या निमीत्ताने नवोदित सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट चे वाटप करण्यात आले अशा पद्धतीने प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करन्यात आले होते याला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बांधव भगिनी यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला .✍