नवागतांना नोटबुक वितरित करून स्वागत शाळा प्रवेशोत्सव ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे नोटबुक वितरत

नवागतांना नोटबुक वितरित करून स्वागत

शाळा प्रवेशोत्सव ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे नोटबुक वितरत

नवागतांना नोटबुक वितरित करून स्वागत शाळा प्रवेशोत्सव ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे नोटबुक वितरत

शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न. 9518727596

गोंडपिपरी : – शाळेची घंटा वाजली असून दि.२९ बुधवारी नवागत विध्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम गोंडपिपरी तालुक्यात सर्व शाळेत उत्साहात पार पडले.
शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवळ निर्माण व्हावी.हा उदात्त हेतू ठेऊन तालुक्यातील वढोली,तारसा बूज,सकमुर,आक्सापुर सह ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक-पेन वाटप नवागतांचे स्वागत केले.
वढोली येथे नोटबुक वितरीत करताना शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,भाजपा युवा कार्यकर्ता संदीप पौरकार,शाळा व्यवस्थापन समितीचे रवी चुदरी,मुख्यध्यापक तोडासे,उमेश उपासे,शिवसैनिक गोकुळ सोंनटक्के,राहुल मेकरतीवार, शुभम भोयर,तारसा बुज येथे युवासेना तालुका शहर प्रमुख निकेश बोरकुटे यांच्या कडून तर भंगाराम तळोधी येथे शिवसेना तालुका उपप्रमुख जयेश कारपेंनवार यांच्या कडून विद्यार्थ्यांना नोट बुक वाटप करण्यात आले.सकमुर येथे युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे यांच्या कडून नवागत विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले.आक्सापुर येथे जर शिवसेना शाखा प्रमुख अभिजित धोडरे यांच्या कडून नोटबुक वाटप करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व शिक्षणवृंद तथा मुख्याध्यापिका मॅडम व समस्त कर्मचारी उपस्थित होते