शांताराम नारायण मोरे स्टेशन मॅनेजर यांचा सेवा निवृत्त कारेक्रम संपन्न
✍संतोष आमले ✍
पनवेल तालुका प्रतिनिधी
📱9220403509📱
पनवेल : पनवेल येथे राहणारे शांताराम नारायण मोरे 35 वर्षांपूर्वी रेल्वे विभागात नोकरी ला लागले त्या नंतर विविध रेल्वे स्टेशन मध्ये कार्यरत होते. रेल्वे खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांशी मनमिळावू राहून आनंदात काम करत प्रामाणिकपणे आपल्या नोकरीचे 35 वर्ष पूर्ण केले. सध्या पनवेल येथील खांदेश्वर रेल्वे स्टेशन मध्ये स्टेशन मॅनेजर या पदावर काम करत सेवा काळ पूर्ण करुन निवृत्त झाले.शांताराम नारायण मोरे यांच्या सेवानिवृत्ती चा कार्यक्रम खांदेश्वर रेल्वे स्थानकातील अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान पुढील आयुष्य निरोगी राहो आशा शुभेच्छा सर्व कर्मचारी व सहकाऱ्यांनी त्यांना दिल्या या वेळी स्टेशन प्रबंधक,श्री अनिल बारटक्के,श्री धनंजय सुरालकर,बेनहर विक्टर,सुदेशना जाधव,अक्षता बेले,ध्रुव जयप्रकाश,विशाल लोखंडे,कैलास सोनार,महाले,मणी पिल्ले,प्रवीण गोरे,जगदीश बैरवा आदि अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.