छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /कारंजा

सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार,
स्थानिक हबीब नगर येथे राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आणि सासरच्या मंडळींनी तिच्या आई बापा कडून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. आज रोजी दुपारी 12 वाजता हबीब नगर येथे घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुस्कानबानो समीर खान (वय 23, रा. हबीब नगर, कारंजा) यांचा मोठा भाऊ राजा अली नौशाद अली (28) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याची धाकटी बहीण मुस्कान बानो हिचा विवाह कारंजा येथील समीर सोबत 2018 मध्ये झाला होता. खानच्या. फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, मयताचे सासरचे लोक घराच्या बांधकामासाठी आई बाबा याच्या कडून पाच लाख रुपये मिळावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते, तसेच मयताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होते. पाच जणांच्या छळाला कंटाळून मृताने रात्री उशिरा गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना नंतर मृतदेह त्याच्या आई कडील लोकांच्या ताब्यात देण्यात आला. सासर च्या त्या पांच लोकांन विरुद्ध भादवी कलम 498, 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिली. दिलेल्या माहिती प्रमाने घटने नंतर पाचही आरोपी फरार झाल्याची माहिती. या प्रकरणाचा तपास पोलीस

उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे, एसएचओ आधारसिंग सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव करीत आहेत.✍