देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आ. किशोर जोरगेवार यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
विदर्भातील प्रति पंढरपूर समजल्या जाणा-या वढा तिर्थक्षेत्र येथे जात घेतले विठ्ठलाचे दर्शन
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱8830857351
चंद्रपूर : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी विदर्भातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वढा तिर्थक्षेत्र येथे जात विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शेतक-यांना सुख समृद्धी देण्याची मनोकामना केली.
चंद्रपूरातील धार्मिक स्थळांना महत्व प्राप्त करुन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यात पोहचावी यासाठी आपण महाकाली महोत्सवाला सुरूवात केली आहे. याला लाभलेला लोकसहभाग ऐतिहासिक आहे. यासोबतच वढा तिर्थक्षेत्रही आपल्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकसीत करायचे आहे. यासाठी शासनस्तरावर माझे प्रयत्न सुरु आहे. यात गावक-र्यांचाही सहभाग लागणार आहे. हे ठिकाण विकसीत झाल्यास वढा गावाचे धार्मिक महत्व वाढणार असुन रोजगाराच्या संधीही ग्रामस्थांना मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन नागरिकांच्या सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली.
याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, शहर संघटक विश्वजित शहा, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, सतनाम सिंग मिर्धा, निलिमा वनकर, रुपा परसराम, वंदना हजारे, कविता निखारे, प्रमिला बावणे आदींची उपस्थिती होती.