आश्रम शाळा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम थाटात.

आश्रम शाळा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम थाटात.

आश्रम शाळा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम थाटात.

आश्रम शाळा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम थाटात.

🖋️धुर्व कुमार हुकरे 🖋️
जमाकुडो प्रतिनिधी
9404839323

दरेकसा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा जमाकुडो तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया येथे शैक्षणिक सत्र 2023- 24 सुरुवात आज दिनांक 30 जून 2023 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जमाकूडो येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्रीमती गीताताई लिल्हारे जिल्हा परिषद सदस्या गोंदिया ह्या होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी येथील मा. श्री विजय मेश्राम होते विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंचा जमाकूडो येथील श्रीमती नूतनताई सोनवाणे, श्री चुनीलाल जी राऊत उपसरपंच ग्रामपंचायत जमाकूडो, श्री शंकर लालजी मडावी माजी सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, श्री मनोज विश्वकर्मा सदस्य ग्रामपंचायत जमाकुडो, पवनलाल मडावी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जमाकुडो, मा. श्री रवी सोनवणे पत्रकार, श्री ध्रुवकुमार हुकरे पत्रकार, श्री अमित वैद्य पत्रकार, तसेच या कार्यक्रमाला पालक वर्ग व विद्यार्थी शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभु कळंबे यांनी केले. नवगतांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाळेचे पाठ्यपुस्तक व लेखन साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता १०वी व १२वी मधून गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये कमलेश बारेवार यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. व शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी पालकांना व विद्यार्थ्याना मोलाचे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला हजर होते.