शिक्षकांना आश्वस्त करणारी सहविचार सभा

शिक्षकांना आश्वस्त करणारी सहविचार सभा

शिक्षकांना आश्वस्त करणारी सहविचार सभा

शिक्षकांना आश्वस्त करणारी सहविचार सभा

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी

शिर्डी : – विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा मध्ये शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेच्या प्रकाश हॉल मध्ये शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित अध्यक्षांचे व सदस्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य आणि शालासमिती अध्यक्ष माननीय श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य ॲड. संदीप अग्रवाल, शालासामिती सदस्य धीरूभाई टेलर, राजेश मेहता, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती. सुनीता ढिले, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, नवनियुक्त पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, नवनियुक्त पर्यवेक्षिका श्रीमती. क्षमा देशपांडे, वरिष्ठ लिपिक कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्री.चंद्रकांत जोशी, नवनियुक्त शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.जयराम उंबरे, नवनियुक्त शिक्षकेतर प्रतिनिधी रवी दंडगव्हाळ उपस्थित होते.
सभेमध्ये सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतामधून श्री.भगवानभाऊ यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि पुढील कामाची रूपरेषा सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा आलेख उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षांनी शिक्षकांकडून काही आश्वासने घेतली आणि शिक्षकांना त्यांच्या कामात मोलाचे सहकार्य करण्याचे आणि विद्या प्रसारिणी सभा शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमने, आभार पर्यवेक्षिका श्रीमती. देशपांडे तर श्री.धनंजय काळे सर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी स्नेहभोजनचा सर्वांनी आस्वाद घेतला.