रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना महिना संपण्यापूर्वी वेतन

ई-कुबेर प्रणालीसह जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना यश, शिक्षकांत आनंदाचे वातावरण

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना महिना संपण्यापूर्वी वेतन ई-कुबेर प्रणालीसह जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना यश, शिक्षकांत आनंदाचे वातावरण

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग – रायगड जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेवर होत नसल्याची ओरड होत असते. तरी रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व ई-कुबेर प्रणालीमुळे जून महिन्याचे वेतन जून महिन्यातच दोन दिवस आधीच झाले आहे. पहिल्यांदाच असे घडल्याने गुरुजींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 28 जून सायंकाळपासून जून महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्यास सुरु झाली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 5 हजार 876 शिक्षक तर 40 केंद्र प्रमुख आहेत.

जानेवारी २०२४ पासून सीएमपी प्रणाली द्वारे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्याचे प्रदान स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होते. परंतु सीएमपी प्रणालीमुळे वेतन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही एक ते दोन दिवसाचा विलंब लागायचा यामुळे राज्याचे कोशागार संचालकांनी पाच एप्रिलला एक पत्र काढून आरबीआय बँकेचे ई-कुबेर प्रणालीने वेतन व भत्त्याचे प्रदान करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानुसार एप्रिल महिन्याचे वेतनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ई कुबेर प्रणालीतील अडथळ्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात तीन दिवस विलंबाने ३ मे रोजी जमा करण्यात आले होते.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डाॅ. भरत बास्टेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, शिक्षण व वित्त विभागातील सर्व कर्मचारी तसेच शालार्थ टीमने विशेष प्रयत्न करून ई कुबेर प्रणालीतील सर्व अडथळे दूर करून जून महिन्याची वेतनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली. त्यामुळे ई कुबेर प्रणालीने जून महिन्यातील जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवस आधीच (28 जूनपासून) जमा होण्यास सुरुवात झाल्याचे संदेश भ्रमणध्वनीवर पडल्याने जिल्ह्यातील शिक्षक वर्गात आनंदाची वातावरण आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 5 हजार 876 शिक्षक तर 40 केंद्र प्रमुख असून या सर्वांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here