ग्रीन अलिबाग च्या वतीने दत्तटेकडी कुरूळ येथे वृक्षरोपण

ग्रीन अलिबाग च्या वतीने दत्तटेकडी कुरूळ येथे वृक्षरोपण
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग -ग्रीन अलिबाग या संस्थेच्या वतीने दत्त टेकडी कुरुळ येथे आज दिनांक 30 जून 2024 रोजी विविध औषधी वनस्पती व निसर्गाला उपयुक्त अशा वृक्षांची लागवड करण्यात आली.
ग्रीन अलिबाग ही संस्था फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आली असून विविध क्षेत्रात व्यवसाय, उद्योगकरणारे,शिक्षण घेनारे महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण तरुणी एकत्र येऊन करणात आली आहे.या ग्रुप चे प्रमुख प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला असून सद्या ७० सदस्य या ग्रुप मद्ये सदस्य आहेत.या संस्थेमार्फत आज दत्त टेकडी कुरूळ येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व सदस्यांनी दत्त टेकडी कुरूळ येथे सकाळी सात वाजता उपस्थित राहून वड, पिंपळ, अशोक, सुरू, उबर ,करंज,जांभूळ,सितफळ अशा विविध निसर्गाला उपयुक्त व औषधी वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य प्रशांत पाटील,याच्या मार्गदर्शनानुसार वृक्ष लागवड करण्यात आली. सर्व उपस्थित सदस्यांना हॉटेल गुरुग्रेस च्या वतीने नाष्टा व पाण्याची सोय करण्यात आली होती.
त्यानंतर सर्व सदस्यांची दत्तमदिर येथे बेठक होऊन पुढील कार्यक्रम विषयी चर्चा करून सर्व एकत्र आले तर कोणताही कार्यक्रम यशस्वी करू शकतो असं म्हणून प्रशांत पाटील यांनी सर्व सदस्याचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here