मुंबई गोवा महामार्गांवर मौजे रेपोली येथे एका अज्ञात वाहनाने डिओ स्कुटीला ठोकर मारून केला पोबारा या अपघातात दोनजण जागीच ठार….

मुंबई गोवा महामार्गांवर मौजे रेपोली येथे एका अज्ञात वाहनाने डिओ स्कुटीला ठोकर मारून केला पोबारा या अपघातात दोनजण जागीच ठार....

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 89832 48048📞

माणगांव :-दि. 30 जून रोजी रात्री सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वर मौजे रेपोली गावच्या हद्दीत गुरुकृपा हॉटेल समोर हा अपघात झाला या अपघातात चालक शेखर शंकर पवार वय वर्ष 18 रा. रेपोली ता. माणगांव व त्याच्या पाठीमागे बसलेला रोशन विनायक चव्हाण वय वर्ष 26 रा. प्लॉट क्र. 103 मात्रपित्र छाया बिल्डिंग लोकमान्य नगर पाडा वर्तक नगर ठाणे हे दोघेही मयत झाले आहेत.

मिळालेल्या पोलीससूत्रांकडून माहितीनुसार मयत क्रमांक 1. हा त्याच्या ताब्यातील डिओ स्कुटी क्रमांक एम एच 06 सि सि 3167 ही रेपोली ते लोणेरे असे मुंबई गोवा हायवेने जात असताना वरील ठिकाणी आले असता कोणीतरी अज्ञात वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन हायगायीने व बेकायदेशीर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मयत यांच्या ताब्यातील डिओ स्कुटीला ठोकर मारून पोबारा केला या घटनेची खबर रेपोली ग्रामस्थांना समजतात रेपोली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक व्ही. पी. सुर्वे यांच्या मार्गदर्शनखाली सह फौंजदार माने हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here