विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांचे क्षेत्रातील आरोग्य केंद्र बेवारस

विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांचे क्षेत्रातील आरोग्य केंद्र बेवारस

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही :- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे प्रभावी आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय वडेट्टीवार यांचे क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरसह अनेक कर्मचाऱ्याविना असल्याने सदर आरोग्य केंद्राची स्थिती बेवारस झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार हे एक प्रभावी आणि कर्तव्यदक्ष नेते म्हणून त्यांची राज्यात चांगली ओळख निर्माण झाली आहे. वडेट्टीवार यांचा अधिकारी आणि कर्मचारी वर्गात चांगलाच वचक असल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा करार संपल्याने, आणि त्यांना अजूनही पूनार्नियुक्त केले नसल्याने सदर आरोग्य केंद्र डॉक्टरविना सुरू आहे. तसेच या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी वितरक, परिचर, यासह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते तथा आमदार वडेट्टीवार यांनी आपल्या क्षेत्रात विकासाची गंगा आणली असल्याचे सोशल मीडियावर सांगितल्या जात असले तरी वडेट्टीवार यांचे दुर्लक्षितपणामुळे सिंदेवाही तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बेवारस झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्राला तालुक्यातील २२ गावे जोडली असून जवळपास २७ हजार नागरिक या आरोग्य केंद्रामधून आरोग्य सेवा पुरविण्यात येते. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते तथा आमदार वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथील आरोग्य यंत्रणेबाबत आवाज उठविला असला, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच विधानसभा क्षेत्रातील वासेरा आरोग्य केंद्रात रिक्त पदांमुळे बेवारस अवस्थेत असल्याने वडेट्टीवार यांनी सिंदेवाही तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष घालून रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here