सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड चा नवीन पूल अजून वाहतुकीच्या प्रतीक्षेत.

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड चा नवीन पूल अजून वाहतुकीच्या प्रतीक्षेत.

जून महिन्याची दिलेली डेडलाईन आज झाली समाप्त.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- राज्य सरकारने दिलेल्या जून महिन्याच्या अखेर डेडलाईन आज संपत आली असून सांताक्रुज चेंबूर लिंक रोड वरील नवीन पुल अजून वाहतुकीच्या प्रतीक्षेत च आहे. कधी होईल वाहतुकीस खुला याची मुंबईकर आतुरतेने वाट बघत आहेत. कारण कालिना पुलाच्या खाली होणारी तासन तास वाहनांची रोजची वाहतूक कोंडी, मुंबईकरांचा जाणारा वेळ याचा विचार करता या नवीन बांधण्यात आलेल्या पुलाच काम मुंबईकरांना पुरता दिलासा देणारा सरकारच प्रोजेक्ट आहे, यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सोईस्कर होण्यात मदत होईल.

चेंबूर, नवी मुंबई वरून येणाऱ्या वाहनाना थेट या पुलावरून पश्चिम दृतगती मार्गांवर जाण्यास सोईचे ठरेल, कालिना पुलाच्या खालून जायची गरज भासणार नाही, त्यात त्यांचा वेळ ही वाचेल आणि इंधन ही, आणि बांद्रा कुर्ला संकुलातून येणाऱ्या वाहनाना कालिना पुलाच्या खालूनच प्रवास करता येईल, चेंबूर मार्गाचे वाहने जर नवीन पुलावरून गेली तर त्याचा ताण कालिनाच्या पुला खाली न जाणवता बांद्रा कुर्ला संकुलातून येणाऱ्या वाहनाना ही सोईस्कर होईल व त्यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा होणारा त्रास कमी होईल.

राज्य सरकारने जून महिन्याच्या अखेरीस नवीन पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल असे सांगण्यात आले होते, पण तसं होताना काही निदर्शनास आले नाही, राज्य सरकारची डेडलाईन फोल ठरताना दिसत आहे, अजून किती प्रतीक्षा करावी लागेल, व अजून किती वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावे लागेल असा सवाल आता मुंबईचे वाहतूकदार करताना दिसते.