काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व आधार कार्ड सेवा उपलब्ध
सिध्देश पवार पोलादपूर प्रतिनिधी 8482851532
पोलादपूर :- पोलादपूर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रगण्य असणाऱ्या काळभैरवनाथ फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने यंदाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमासोबतच आधार कार्ड नोंदणी आणि अपडेटसाठी एक विशेष केंद्र देखील उभारण्यात आले होते, ज्यातून अनेकांना तातडीने सेवा मिळाली.
या उपक्रमाचे आयोजन श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे कमिटी आधारस्तंभ श्री किसनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थापक विकास शिंदे,अध्यक्ष अंकुश घोलप,अध्यक्ष दिपक उतेकर तसेच सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांच्या सहकार्याने सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास किसन भोसले, पोलादपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आनंद रावडे साहेब वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, महिला कमिटी सदस्य शिल्पाताई साळुंखे पुणे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे व फाउंडेशनचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात काही अपरिहार्य कारणास्तव नामदार भरतशेठ गोगावले साहेब अनुपस्थित राहिले. मात्र, त्यांनी दूरध्वनीवरून आयोजकांशी संवाद साधत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व भविष्यात फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि प्रेरणादायी वातावरण यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्साहवर्धक ठरला.