सावित्री विभाग क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री दत्ता केसरकर यांची एकमताने निवड
प्रतिनिधी: सिद्धेश पवार, पोलादपूर
पोलादपूर :- पोलादपूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सावित्री विभाग क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री दत्ता केसरकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. क्रिकेट हा केवळ खेळ न राहता, आजच्या घडीला युवा वर्गासाठी एक प्रेरणा ठरत आहे. हे ओळखून सावित्री क्रिकेट असोशियन चे संस्थापक निलेश जी कोळसकर यांच्या अधिपत्याखाली क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून, त्यामार्फत तालुक्यातील तरुणांना क्रिकेटसारख्या शिस्तबद्ध खेळाकडे वळवण्याचा उद्देश आहे.
या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री दत्ता केसरकर यांची निवड होणे हे संघटनेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक पाऊल मानले जात आहे. तसेच पुढिल कार्यकारिणी हि जाहीर करण्यात आले ती अशी. सावित्री विभाग क्रिकेट असोसिएशन
सरचिटणीस – श्री. अमित घाडगे
कार्याध्यक्ष – श्री. युवराज दाभेकर सचिव – श्री. संदीप दाभेकर खजिनदार – श्री. मयूर भोसले संपर्क प्रमुख – श्री. गणेश केसरकर उपाध्यक्ष – श्री. मनोज घाडगे सहकार्याध्यक्ष – श्री. सचिन सुर्वे सहसचिव – श्री. संदेश करनाळे सह खजिनदार – श्री. गणेश रिंगे
सल्लागार मंडळ श्री. रामदास खोपडे श्री. भागवत दाभेकर श्री. राजन पवार श्री. बाबू रिंगेश्री. प्रमोद घाडगे श्री. प्रमोद केसरकर
श्री. किशोर केसरकर श्री. राजू भोसले श्री. संतोष रिंगे
श्री. विठोबा दाभेकर श्री. बबन घाडगे श्री. दीपक रिंगे
सद्दस्य मंडळ
श्री. दिनेश केसरकर श्री. रमेश दळवी श्री. चंद्रकांत दळवी श्री. विलास मोरे श्री. संतोष गोळे श्री. प्रशांत कुमठेकर श्री. चेतन उपाळे या प्ररकारे कार्यकारिणी जाहीर करण्यात आले श्री दत्ता केसाकर त्यांचे जीवन हे सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
श्री दत्ता केसरकर यांचा प्रवास हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झाला. गावातील गरिबीतून मुंबईत पाऊल ठेवणारे श्री केसरकर यांनी सुरुवातीला एका प्रिंटिंग प्रेसमध्ये साधी नोकरी स्वीकारली. मात्र त्यांच्या प्रामाणिकपणा, मेहनत आणि चिकाटीमुळे त्यांनी आपल्या मालकांचा विश्वास मिळवला आणि स्वतःच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली.
आज ते ‘दत्ता’ ते ‘दत्ताशेठ’ असा यशस्वी प्रवास करत समाजात मानाचं स्थान प्राप्त करून आहेत. कोणताही सामाजिक, सांस्कृतिक वा क्रीडा उपक्रम असो – श्री केसरकर यांची उपस्थिती नेहमीच ठळक असते. त्यांच्या दारात आलेला कोणताही माणूस रिकामा परत जात नाही, याची ते नेहमीच काळजी घेतात. ही त्यांची लोकांप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.
सावित्री विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तालुक्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळणार असून, भविष्यात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्येही इथून खेळाडू तयार होतील, अशी आशा आहे.
संस्थेचे अध्यक्ष म्हणून दत्ता केसरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन निश्चितच उत्तुंग यश गाठेल, असा विश्वास सर्व सभासदांनी व्यक्त केला आहे.